एक्स्प्लोर

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव येणार, ममता बॅनर्जींच्या TMC चा पुढाकार, काँग्रेस, सपाचा पाठिंबा

TMC : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात लोकसभेत विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. याचवेळी तृणमूल काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : विरोधी पक्षांकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर काल आणि आज लोकसभेत चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असतानाच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसनं मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्तावासाठी पुढाकार घेतला आहे. तृणमूलच्या या निर्णयाला विरोधी पक्षांकडून समर्थन देण्यात आलं आहे. 
 
तृणमूल काँग्रेसनं पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या एसआयआरमधील अनियमिततांचं कारण देत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या प्रस्तावाची घोषणा तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी केली. संविधानाच्या कलम 324 नुसार ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणला जाईल, असं ते म्हणाले.  आम्ही महाभियोग प्रस्ताव मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात राज्य घटनेच्या  कलम 342 नुसार आणत आहोत. कुमार यांच्या कामकाजाबद्दल अनेक तक्रारी असल्याचं सौगत रॉय यांनी म्हटलं. 

रॉय पुढं म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये 59 लाख मतदार 'अ‍ॅज्युडिकेशन' यादीत म्हणजेच न्यायनिर्णय प्रक्रियेत असून ही खूप मोठी संख्या आहे. ममता बॅनर्जी जे म्हणत आहेत ते बरोबर आहे. आम्ही येत्या काही दिवसांमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणत आहोत, असं रॉय म्हणाले. 

काँग्रेसचा पाठिंबा 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं तृणमूल काँग्रेसच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. काँग्रेसचे खासदार उदित राज यांनी महाभियोग प्रस्तावाला पाठिंबा देऊ असं म्हटलं आहे. महाभियोग प्रस्ताव ही स्वागतार्ह बाब आहे, आम्ही या मुद्यावर काही काळ संघर्ष केला आहे, असंही ते म्हणाले. काँग्रेस खासदार सुखदेव भगत यांनी देखील एसआयआर राबवण्याच्या प्रक्रियेवर टीका केली. काँग्रेसला पाठिंबा देणारे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी देखील मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात कारवाईची मागणी केली. समाजवादी पार्टीचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी देखील टीएमसीच्या प्रस्तावाचं स्वागत केलं आहे. याशिवाय त्यांनी महाभियोग प्रस्तावावेळी तृणमूल काँग्रेससोबत राहणार असल्याचं म्हटलं.

दरम्यान, भाजप नेत्यांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आणल्या जाणाऱ्या महाभियोग प्रस्तावाविरोधात भूमिका मांडण्यात आली.  मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री सुकांता मुजुमदार, भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी महाभियोग प्रस्तावावरुन काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर टीका केली.  आता तृणमूल काँग्रेस मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव कधी आणणार हे पाहावं लागेल.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
PM Modi Video Row : मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे आक्रमक
मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, निशिकांत दुबे आक्रमक 
Prashant Kishor : भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget