एक्स्प्लोर
Ind vs SA Test Match Highlights:टीम इंडियाचा दणदणीत विजय,भारताची कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी
सेन्च्युरियन कसोटी जिंकून विराट कोहलीच्या टीम इंडियानं दक्षिण आफ्रिका दौऱ्याची दणक्यात सुुरुवात केलीय. कसोटीच्या आजच्या पाचव्या दिवशी भारतानं दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १९१ धावात गुंडाळला. आणि ११३ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज या त्रिकुटानं दोन्ही डावात दमदार कामगिरी बजावली. शमीनं आणि सिराजनं प्रत्येकी ३ तर सिराज आणि अश्विननं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. दरम्यान सेन्च्युरियन कसोटी जिंकून टीम इंडियानं तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
आणखी पाहा























