एक्स्प्लोर

Rinku Singh Father passes away: मोठी बातमी: भारताचा क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन

Rinku Singh Father passes away: रिंकू सिंह वडिलांच्या आजारपणामुळे विश्वचषक स्पर्धा अर्ध्यावर सोडून माघारी परतला होता. शुक्रवारी पहाटे रिंकू सिंह याच्या वडिलांचे निधन

Rinku Singh Father passes away: भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज रिंकू सिंह याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकू सिंह याचे वडील खचंद्र सिंह यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. खचंद्र सिंह यांनी स्टेज-4 चा यकृताचा कर्करोग होता. अलीकडेच त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वडिलांची प्रकृती खालावल्याचे समजल्यानंतर रिंकू सिंह टीम इंडियाची (Team India) साथ सोडून घरी परतला होता. गेल्या दोन दिवसांपासून रिंकू सिंहच्या (Rinku Singh) वडिलांची प्रकृती चिंतानजक होती. त्यांना कृत्रिम श्वसनप्रणालीवर ठेवण्यात आले. अखेर आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रिंकू 24 फेब्रुवारी रोजी चेन्नई सोडत प्रथम दिल्लीला पोहोचला आणि नंतर ग्रेटर नोएडा येथे रुग्णालयात दाखल असलेल्या वडिलांना भेटला होता. हीच त्यांची अखेरची भेट ठरली.

रिंकू सिंहचे वडील खचंद्र सिंह हे घरोघरी सिलेंडर पोहोचवण्याचे काम करायचे. बालपणी गरिबीमुळे रिंकू सिंहला बराच संघर्ष करावा लागला होता. रिंकू सिंह क्रिकेटपटू म्हणून यशस्वी झाल्यानंतर त्याने वडिलांना सिलेंडर डिलिव्हरीचे काम सोडायला लावले होते. अलीकडेच रिंकूने आपल्या वडिलांना महागडी स्पोर्टस बाईक भेट म्हणून दिली होती.  या दोघांमध्ये एक उत्तम ऋणानुबंध होता. त्यामुळे वडिलांच्या निधनामुळे रिंकू सिंह याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

खचेंद्र सिंह हे गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर रिनल रिप्लेसमेंट थेरपी सुरु होती. सध्या भारतीय संघ टी-20 विश्वचषक खेळत आहे. रिंकू सिंहदेखील या भारतीय संघाचा भाग आहे. वडिलांची प्रकृती बिघडल्याचे समजल्यानंतर रिंकू सिंह अर्ध्यातच माघारी परतला होता. मंगळवारी चेन्नईत भारतीय संघाच्या सरावावेळी रिंकू सिंह हजर नव्हता. भारताच्या तरुण आणि उज्ज्वल भविष्य असणाऱ्या खेळाडूंमध्ये रिंकू सिंहची गणना होते. 28 वर्षांचा रिंकू सिंह उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे राहणार आहे. बुधवारी भारतीय संघाच्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी रिंकू सिंह याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे रिंकूला घरी परतावे लागल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, वडिलांची प्रकृती सुधारल्यावर रिंकू परत येईल, असा विश्वास त्यांनी दाखवला होता. मात्र, आता रिंकू सिंह याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे रिंकू सिंह भारतीय संघासोबत यापुढे विश्वचषक स्पर्धेत खेळणार की नाही, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Rinku singh: रिंकू सिंह विश्वचषक स्पर्धेत खेळणार की नाही?

रिंकू सिंह यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत कालचा झिम्बाम्बेविरुद्धचा सामना सोडून उर्वरित सर्व मॅचेसमध्ये खेळला आहे. मात्र, खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असल्याने रिंकू सिंहला खेळण्याची फारशी संधी मिळाली नव्हती. अमेरिका आणि नामेबिया यांच्याविरुद्ध रिंकू सिंह एक आकडी धावसंख्येच्या पलीकडे मजल मारु शकला नव्हता.  पाकिस्तानविरुद्ध रिंकू सिंह 4 चेंडूत 11 धावा करुन माघारी परतला होता. नेदरलँडसविरुद्ध त्याने 3 चेंडूत सहा धावा केल्या होत्या. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. आता भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जाण्यात यशस्वी ठरला तर रिंकू सिंह पुढचे सामने खेळणार की नाही, हे पाहावे लागेल.

आणखी वाचा

टीम इंडियाने खातं उघडलं अन् गेम फिरवला! झिम्बाब्वे पराभूत, भारताला सेमीफायनलचं तिकीट मिळणार?, 1 मार्चला ठरणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ban vs Pak 3rd ODI : पाकिस्तानाचा झिम्बाब्वे झालाय? लाज वाटू द्या...; बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज संतापला, नको नको ते बोलला
पाकिस्तानाचा झिम्बाब्वे झालाय? लाज वाटू द्या...; बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज संतापला, नको नको ते बोलला
Harshit Rana News : हातात काठी, लंगडत पोहोचला... हर्षित राणाच्या 15 सेकंदांच्या व्हिडीओने क्रिकेट विश्वात खळबळ; नेमकं काय घडलं?
हातात काठी, लंगडत पोहोचला... हर्षित राणाचा 15 सेकंदांचा व्हिडीओ पाहून सगळे हादरले; नेमकं काय घडलं?
BAN vs PAK 3rd ODI : ICC ची ट्रॉफी चोरुन आणायची का?; पाकिस्तानच्या माजी खेळाडूने सुनावलं, कधीही न बोललेले शब्द बोलून गेला
ICC ची ट्रॉफी चोरुन आणायची का?; पाकिस्तानच्या माजी खेळाडूने सुनावलं, कधीही न बोललेले शब्द बोलून गेला
BAN vs PAK 3rd ODI : 11 वर्षांनंतर मानहानीकारक पराभव अन् पाकिस्तानचे रडगाणे सुरू... थेट ICC कडे तक्रार, शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?
11 वर्षांनंतर मानहानीकारक पराभव अन् पाकिस्तानचे रडगाणे सुरू... थेट ICC कडे तक्रार, शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Donald Trump on Nato: इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
Odisha Government Hospital Fire: जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
Maharashtra Weather Alert: सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
Embed widget