एक्स्प्लोर
Namibia vs SriLanka : नामिबियाची विजयी सलामी, श्रीलंकेवर 55 धावांनी मिळवला विजय
T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेला फायनली सुरुवात झाली आहे. नुकताच पहिला सामना श्रीलंका आणि नामिबिया (SL vs NAM) यांच्यात पार पडला असून यामध्ये नामिबिया संघाने ऐतिहासिक विजय मिळवत स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने श्रीलंकेला विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य दिले. ज्यानंतर श्रीलंकेचा संघ मात्र 19 षटकांत 108 धावा करुन ऑलआऊट झाला ज्यामुळे नामिबायाने 55 धावांनी सामना जिंकत विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. नामिबियाकडून जॅन फ्रायलिंकने 28 चेंडूत ठोकलेल्या 44 धावा नामिबियासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.
आणखी पाहा























