(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 11 PM : 29 June : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
बार्बाडोसच्या मैदानात फायनलची लढाई रंगात, १७७ च्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे चार फलंदाज तंबूत, अर्शदीपला दोन विकेट्स
आगामी निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरं जायचं, भाजप प्रभारींचे कोअर कमिटी सदस्यांना निर्देश..तर बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरला
फोटोग्राफीमध्ये आवड असणारी व्यक्ती मुख्यमंत्री झाली की खूप प्रॉब्लेम होतो...
देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका...
२०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा पैशाच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही, पुण्यातल्या पोर्शे प्रकरणावरुन राज ठाकरेंचं टीकास्त्र, अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात राज ठाकरेंची मुलाखत
विधीमंडळात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरुन घमासान..निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजनेची घोषणा, विरोधकांचा आरोप तर लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक हक्कभंग आणण्याच्या तयारीत
भविष्यात वैद्यकीय प्रवेश परीक्षा राज्यांमार्फत घेण्याचा विचार होऊ शकतो, अजित पवारांचे संकेत...कडक कायदा करण्याची विरोधकांची मागणी...
नीट पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढली...लातूरसोबत बीडचंही कनेक्शन... आरोपींकडे सापडलेल्या १४ एडमिट कार्ड पैकी ७ कार्ड बीडच्या विद्यार्थ्यांचे असल्याचं समोर
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान, तर तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम
आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी.. वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांचा फुगडीचा फेरा, रथांचं केलं सारथ्य...