Ukraine : विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी युक्रेनकडून विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था
Russia Ukraine War : युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरूच आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात सातत्याने अडचणी येत आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना सूचना (Advisory) जारी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या पूर्वेकडील भागात सध्या परिस्थिती वाईट असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता भारतीयांना जिथे आहात तिथेच राहण्यास सांगण्यात आले आहे. नव्या आदेशानुसार, युक्रेनमधील भारतीयांनी घाबरून न जाता स्वत:ला सुरक्षित ठेवणे आता महत्त्वाचे आहे. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि लोकांना भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात आले आहे.























