Horoscope Today 12 March 2026: आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! दत्तगुरूंच्या कृपेने आलेलं संकट माघारी फिरणार, आजचे राशीभविष्य वाचा..
Horoscope Today 12 March 2026: आज गुरूवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 12 March 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 12 मार्च 2026, आजचा वार गुरूवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज कधीतरी अति संवेदनशीलतेमुळे निराश होण्याचे योग येतील, एखाद्याबद्दल खूप सहानुभूती वाटेल, ज्यामुळे त्यांना मदत कराल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज जवळच्या नात्यांमधून अपेक्षाभंगाचे दुःख अनुभवास येतील, कुठेही अंधविश्वास ठेवून काम करू नका
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज एखादे आव्हान पेरण्याचे मनोगत कराल, परंतु आपल्या जवळच्या सामर्थ्याचा अंदाज घ्या, नाहीतर निराशा पदरात पडेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात काही त्रास संभवतील, महिला थोड्या विसरभोळ्या बनतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज थोडेसे लहरी आणि विक्षिप्त बनाल, कोणत्याही कामाचा जास्त ताण घेऊ नये
कन्या रास (Virgo Horocsope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज अतिस्पष्टपणे आणि परखड बोलण्याने सहवासातील जवळच्या लोकांची मने दुखावली जातील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज नोकरीत वरिष्ठांशी जमणार नाही, हातामध्ये सतत नाविन्य शोधण्याकडे आणि बदलण्याकडे कल राहील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज संपत्ती स्थितीमध्ये सतत चढ-उता राहू शकतात, मुलांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे थोडे वैतागून जाईल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज घरामध्ये कित्येक वेळा एकांगी विचार कराल आणि असे विचार जवळच्या लोकांना रुचणार नाहीत
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज महिलांनी ताण कमी करण्यासाठी प्राणायाम आणि ओंकार याचा आधार घ्यावा, व्यापारातील बौद्धिक झेप वाढेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज बरेच दिवसांपासून एखादे काम करण्याची इच्छा पूर्ण होईल, पैशाची चणचण दूर झाल्याने हायसे वाटेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणत्याही धोका पत्करू नका, तुम्ही जे काम कराल त्या कामांमध्ये तुम्हाला मान मिळेल.
हेही वाचा>>
Gudi Padwa 2026: लक्षात ठेवा! गुढीपाडव्याला गुढीला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसवू नका! मग सुख-समृद्धीसाठी कोणत्या रंगाची साडी नेसवावी? ज्योतिषी सांगतात...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















