Kashmir चे फुटिरतावादी नेते Syed Ali Shah Geelani यांचं निधन, Pakistan मध्ये राजकीय दुखवटा जाहीर
Syed Ali Shah Geelani Death : हुर्रियत कॉन्फरन्स (जी) चे माजी अध्यक्ष आणि फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. बुधवारी श्रीनगरमध्ये आपल्या राहत्या घरी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांच्या छातीत दुखत असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केले असून कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या.
मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं की, "गिलानी साहेबांच्या निधनाच्या वृत्तानं दुःखी झालेय. आम्ही बर्याच गोष्टींवर सहमत होऊ शकलो नाही, पण मी ठामपणे आणि दृढ विश्वासानं आपल्या भूमिकांवर ठाम राहिल्याबद्दल त्यांच्या आदर करते. अल्लाह त्यानां जन्नत देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि हितचिंतकांना संवेदना."
गिलानी बराच काळापासून आजारी होते आणि 2008 पासून त्यांच्या हैदरपोरा येथील निवासस्थानी नजरकैदेत होते. गेल्या वर्षी त्यांनी हुर्रियत कॉन्फरन्स (जी) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. सय्यद अली शाह गिलानी यांचा जन्म 29 सप्टेंबर 1929 रोजी झाला. ते जम्मू -काश्मीरचे फुटीरतावादी नेते होते. ते आधी जमात-ए-इस्लामी काश्मीरचे सदस्य होते, पण नंतर तेहरिक-ए-हुर्रियतची स्थापना केली. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी पक्षांचा गटाचे आणि ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्स (APHC) चे अध्यक्ष म्हणून काम केलं. ते 1972, 1977 आणि 1987 मध्ये जम्मू -काश्मीरच्या सोपोर मतदारसंघातून आमदार होते. जून 2020 मध्ये त्यांनी हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुखपद सोडले.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
