Eknath Shinde PC Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूरमुळे पाकमधल्या दहशतवाद्यांचे कंबरडे मोडलं'
Eknath Shinde PC Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूरमुळे पाकमधल्या दहशतवाद्यांचे कंबरडे मोडलं'
Who Is Masood Azhar: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आज (7 मे) पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) या एअरस्ट्राइकमध्ये कुख्यात दहशतवादी मसूर अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा झाला. इतरही अनेक दहशतवादी या एअर स्ट्राइकमध्ये मारले गेले आहेत. यात मसुद अजहरचा भाऊ रऊफ अजगर हा गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईत झालेल्या 26/ 11 च्या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर (Masood Azhar) असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर मसूद अजहरचा अनेक मोठ्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता. भारताच्या भूमीवर दहशतवादाने थैमान घडणारा मसूद अजहर नेमका कोण? कोणत्या दहशतवादी कारवायांमध्ये तो होता? पाहूया...
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पिढी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर करण्यात आले. या कारवाईत नऊ दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष करून नष्ट करण्यात आले. निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची पूर्ण काळजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान घेण्यात आली होती. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणांनाही ऑपरेशन सिंदूरमध्ये लक्ष्य करण्यात आले. या लपण्यांच्या ठिकाणांपैकी काही दहशतवादी हे मसूद अजहरचे होते. जे भारतीय सैन्याने उध्वस्त केले आहेत.



















