Maharashtra Live blog: राज्यभरात पुन्हा कोसळ'धार'! मुंबईसह उपनगरांसाठी येलो अलर्ट, संपूर्ण महाराष्ट्रासाठी IMD चा अंदाज काय?
Maharashtra Live blog updates: राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेटस् जाणून घेण्यासाठी
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला.... त्यानंतर कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये क्रिकेटप्रेमींनी मध्यरात्री गर्दी केली....आणि भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानंतर एकच जल्लोष केला.... छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.... यावेळी फटाक्यांची देखील आतिषबाजी करण्यात आली....
मुसळधार पावसाने आष्टी तालुक्यात हाहाकार
ड्रोन सौजन्य - सागर धोंडे/ शरद गर्जे
Anc: मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात हाहाकार माजविला आहे. आष्टीतील कडा शहर संपूर्णपणे पाण्याने वेढलंय. हीच परिस्थिती ड्रोनच्या माध्यमातून टिपलीय ड्रोन पायलट सागर धोंडे आणि शरद गर्जे यांनी... कडा शहरातील साप्ते कुटुंबातील सतरा जणांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आल आहे.
आष्टी तालुक्यातील देवळाली, कारखेल खुर्द, चोभा निमगाव, देवी निमगाव आणि कडा शहराला सर्वाधिक मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. अजूनही या ठिकाणच्या पुराचे पाणी ओसरलेले नाही. तर आष्टीतील कडी आणि लिंबोडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलीय.. याबरोबरच सुरडी गावातील दोन पाझर तलाव फुटून सर्व पाणी गावाबाहेर आल आहे. दरम्यान हीच परिस्थिती लक्षात घेता तहसील प्रशासन अलर्ट झाले असून नागरिकांना सतर्कतेच आवाहन केलं जात आहे.
ड्रोनच्या माध्यमातून या शहराची विदारक परिस्थिती दिसून येते आहे..
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी कळमनुरी मध्ये आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा
हिंगोली
Feed what's app ग्रुप वर दिले आहे
Slug - कळमनुरी मध्ये आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी मोर्चा
अँकर
हिंगोली शहरातील कळमनुरी तालुक्यामध्ये आज आदिवासी समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं आदिवासी पँथर संघटनेच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेल होत मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर या गॅझेट नुसार मराठा समाजाला आरक्षण दिले जाते आणि याच गॅझेटनुसार आता बंजारा समाज बांधव सुद्धा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गांमधून आरक्षण मागणी करत आहेत बंजारा समाजाच्या या मागणीच्या विरोधामध्ये आज हा मोर्चा कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला आहे कळमनुरी शहरातून हा मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चामध्ये जिल्हाभरातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असल्यास आपल्या पाहायला मिळाला आहे
TT























