Mumbai Rain LIVE: मुंबईकरांनो सावधान, पुढील तीन तास जपून, अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा अलर्ट
Mumbai Rains Live updates: मुंबईतील पावसाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. मुंबई आणि ठाणे परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस आहे. आगामी काही तासांत पाणी तुंबण्याची शक्यता
LIVE

Background
Mumbai Rains Live updates: मुंबई आणि उपनगर परिसरात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी पहाटेपासून या पावसाचा जोर आणखी वाढला आहे. सध्या मुंबईतील आकाशात काळ्या ढगांची गर्दी असून आगामी काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता आहे. मुंबईतील पावसाचे, लोकल ट्रेन आणि रस्ते वाहतुकीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
Mumbai Rain Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान मालगाडीच्या इंजिनात तांत्रिक बिघाड, वाहतूक विस्कळीत, कल्याणवरुन दुसरं इंजिन मागवलं.
Mumbai Rains: मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी BMCचा कर्मचारी मॅनहोलच्या तोंडावर बसला, जीव धोक्यात घालून ड्युटी बजावली
Mumbai Rains: मुंबईत काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. दक्षिण मुंबईतील पाणी तुंबण्याचे हॉटस्पॉट असलेल्या हिंदमाता, किंग्ज सर्कल, माटुंगा, फाईव्ह गार्डन आणि हिंदू कॉलनी परिसरात पाण्याचा निचरा न झाल्याने (Water Logging) मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
























