(Source: ECI/ABP News/ABP Majha)
China Three Child Policy : चीनमध्ये आता तीन मुलं जन्माला घालण्यास सरकारची परवानगी ABP Majha
चीनची लोकसंख्या सर्वाधिक असतानाही तिथल्या सरकारनं आता लोकसंख्या वाढवण्याचा घाट घातलाय. यामागे कोरोनामुळे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचं कारण तर नाही ना? अशी चर्चा आता सुरू झालीय. चीन हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असला तरी तिथल्या जन्मदरात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे भविष्यात लोकसंख्येचं संतुलन बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असताना चीननं हा निर्णय घेतला आहे. नव्या धोरणात चिनी दाम्पत्यांना तीन अपत्यं जन्माला घालण्याची परवानगी दिली आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षानं मे महिन्यात घेतलेल्या निर्णयाला नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीनं शुक्रवारी मंजुरी दिली. आधी दोन अपत्यच जन्माला घालावीत हे धोरण आता शिथिल करण्यात आलंय. त्यातच कोरोनामुळे चीनमध्ये ४ हजार ६००च्या आसपास मृत्यू दाखवले असले तरी प्रत्यक्षात मोठी जीवितहानी झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता लोकसंख्या वाढीसाठी हम दो, हमारे तीन धोरण आखताना चीन सरकारनं त्यासाठी भरघोस सवलतीही दिल्या आहेत.