एक्स्प्लोर
Corona Patients : ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, नव्याने व्हेरिएंटमुळे चिंता वाढली
कोरोनाच्या विळख्यातून जग सुटलंय असं वाटत असतानाच ब्रिटनमधून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. संपूर्ण देशभरात लसीकरण झालेलं असतानाही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवलीय. करोनाच्या या नवीन व्हेरिएंटला ईजी ५.१ असं नाव देण्यात आलं आहे. तसेच त्याला ईजी ५.१ एरिस असंही म्हटलं जात आहे. यूकेमध्ये अलीकडेच ४ हजार ३९६ लोकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३.७ टक्के लोक कोरोनाबाधित असल्याचं आढळलं.
आणखी पाहा























