Ayman al-Zawahiri : अल-कायदाच्या म्होरक्याचा खात्मा, ले. कर्नल सतीश ढगे, 'माझा'वर ABP Majha
कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीचा खात्मा करण्यात अमेरिकेला यश आलंय... अमेरिकेनं अफगाणिस्तानात केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरीचा मृत्यू झालाय... अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका सेफ हाऊसमध्ये जवाहिरी लपून होता. मात्र अमेरिकेनं ड्रोनमधून केलेल्या मिसाईल हल्ल्यात हे सेफ हाऊस उद्द्वस्त केलं. त्यातच जवाहिरीचा खात्मा झालाय. ११ वर्षापूर्वी अमेरिकेनं लादेनचा खात्मा केल्यानंतर जवाहिरीनं अल कायदाची सूत्र हाती घेतली होती.. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यात अल कायदाचा हात होता. त्याच्या डोक्यावर २५ लाख डॉलर्सचं बक्षीसही होतं. त्यामुळे जवाहिरीच्या मृत्यूनंतर ९/११ च्या हल्ल्याचा बदला पूर्ण झाला अशी भावना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केलेलय.



















