Sirajuddin Haqqani : अफगाणिस्तानचा मोस्ट वॉन्टेड 'गृहमंत्री', गृहमंत्र्याच्या डोक्यावर 37 कोटींचं बक्षीस!
Taliban New Government: तालिबान्यांनी मंगळवारी काळजीवाहू सरकारच्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. तालिबानची निर्णय घेणारी शक्तिशाली संस्था 'रहबारी शूरा'चे प्रमुख मुल्ला मोहम्मद हसन अखुंद यांची अफगाणिस्तानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुल्ला अब्दुल गनी बरदार, जे घोषणेपूर्वी बराच काळ चर्चेत होते, त्यांना उपपंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
इराणच्या धर्तीवर तालिबानने सरकार स्थापन केले आहे. जिथे तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हेबतुल्लाह अखुंदजादा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नेता असेल. सरकारच्या मंत्र्यांच्या नावांची घोषणा करताना तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले की, सरकार चालवण्यासाठी ही तात्पुरती व्यवस्था केली जात आहे.
























