Thane Kalwa Hospital : कळवा रुग्णालय मृत्यू प्रकरणाची आठ तास चौकशी
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरू झालीय. काल ९ सदस्यांच्या चौकशी समितीने तब्बल आठ तास चौकशी केली शिवाय रुग्णालयात जाऊन समितीने आढावा घेतला. या रुग्णालयातील मृत्युच्या तांडवाची बातमी प्रथम एबीपी माझाने दाखवली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बातमीची दखल घेऊन चौकशीसाठी समितीची स्थापना केली. या समितीची पहिलीच बैठक ठाणे महापालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात झाली. या बैठकीत मृत्यूंच्या कारणासोबतच इतर महत्वाच्या गोष्टींवरही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. १२ ऑगस्टच्या रात्री १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या आठवड्यात एकूण २७ रुग्णांचा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. या समितीला २५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करायचा आहे.
























