Rishabh Pant : दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या जागी कोणाला संधी देणार? पत्रकारांचा प्रश्न कॅप्टन रिषभ पंत उत्तर देत म्हणाला...
IND vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी उद्यापासून गुवाहाटीमध्ये सुरु होणार आहे. या कसोटीत भारताचा कॅप्टन रिषभ पंत असेल.

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी उद्यापासून गुवाहाटीमध्ये सुरु होत आहे. भारताचा कसोटी संघाचा नियमित कर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्यानं दुसऱ्या कसोटीत नेतृत्व विकेटकीपर रिषभ पंत याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी रिषभ पंतनं पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी रिषभ पंतला शुभमन गिलच्या जागी कोणाला संधी देणार हे विचारण्यात आलं.
Rishabh Pant : शुभमन गिलच्या जागी कोण? रिषभ पंत म्हणाला...
रिषभ पंत म्हणाला केवळ एका कसोटीत नेतृत्व करणं सर्वोत्कृष्ठ स्थिती नाही. मात्र, मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटीतील मोठ्या आव्हानांबाबत फार विचार करत नाही. रिषभ पंत म्हणाला एका कॅप्टनसाठी एक मॅच चांगला पर्याय नसतो, मात्र बीसीसीआनं मला हा सन्मान दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. रिषभ म्हणाला की कधी कधी तुम्ही मोठ्या संधीबद्दल अधिक विचार करता त्याचा काही फायदा होत नाही. रिषभ म्हणाला मी जास्त विचार करु इच्छित नाही. पहिली कसोटी आमच्यासाठी अवघड होती, आम्ही कसोटी जिंकायसाठी जे करावं लागेल ते करु असं, रिषभ पंतनं म्हटलं
दक्षिण आफ्रिकेनं भारताला ईडन गार्डन्सवरील पहिल्या कसोटीत पराभूत करत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. पहिल्या कसोटीत पहिल्या डावात फलंदाजी करताना शुभमन गिलच्या मानेत वेदना होऊ लागल्या होत्या. त्यामुळं त्याला रुग्णालयात न्यावं लागलं होतं. रिषभ पंत म्हणाला की संघ व्यवस्थापनानं शुभमन गिलच्या जागी खेळणाऱ्या खेळाडूच्या बाबत निर्णय घेतला आहे. मात्र, रिषभनं खेळाडूचं नाव सांगितलं नाही.
रिषभ पंत म्हणाला की आम्ही शुभमन गिलच्या जागी कोण खेळणार याचा निर्णय घेतलाय, जो खेळाडू खेळणार आहे त्याला सांगण्यात आलं आहे. तो पुढं म्हणाला, जी टीम चांगलं क्रिकेट खेळेल ती जिंकेल. शुभमन गिल मॅचसाठी उत्सुक होता. गिल सोबत मी दररोज बोलतो. मला काल रात्री समजलं या कसोटीत मी कॅप्टन असेल, असं रिषभ पंतनं म्हटलं.
भारताची संभाव्य प्लेईंग 11
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, वॉशिंगटन सुंदर, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, रिषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेईंग 11
रेयान रिकल्टन, एडन मार्क्रम, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कॅप्टन ), टोनी डी ज़ोरजी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (विकेट कीपर), मार्को जेनसन, कॉर्बिन बॉश, सायमन हार्मर, केशव महाराज.



















