एक्स्प्लोर

Labour Codes : एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?

New Labour Codes : केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी देशात नव्या कामगार संहितांची अंमलबजावणी सुरु झाल्याचं जाहीर केलं आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं चार कामगार संहितांची अंमलबजावणी 21 नोव्हेंबर 2025 पासून करण्याची अंमलबजावणी सुरु करत असल्याची माहिती दिली. ही माहिती केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी दिली. चार संहितामध्ये वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाची अट संहिता 2020 यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे देशातील प्रचलित 29 कामगार कायदे एकत्रित करून सुलभ व आधुनिक नियामक चौकट तयार आल्याचं जाहीर करण्यात आलं. या सुधारणांमुळं भारतीय कामगारांचं कल्याण होईल, औद्योगिक क्षेत्र अधिक सक्षम होईल आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ठोस पाऊल टाकण्यास मदत मिळेल, असं  सांगण्यात आलं आहे. नव्या संहितांनुसार ग्रॅच्युईटीसाठी कायमस्वरुपी नोकरीतील एक वर्ष पूर्ण झाल्यावर कर्मचारी पात्र ठरणार आहे. जी पूर्वी पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळत होती. 

ग्रॅच्युईटी कधी मिळणार?

निश्चित कालावधीच्या कर्मचाऱ्यांसाठी नव्या कामगार संहितेप्रमाणं  कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना जे लाभ मिळतात त्याच्या समकक्ष लाभ दिले जाणार आहेत. ज्यामध्ये रजा, वैद्यकीय सुविधा आणि सामाजिक सुरक्षेचा समावेश असेल.  याशिवाय ग्रॅच्युईटीसाठी सेवेचा एक वर्षाचा कालावधी निश्चित झाल्यानंतर ते पात्र ठरतील. यापूर्वी यासाठी पाच वर्षांचा कालावधी निश्चित होता. कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांप्रमाणं समान वेतन, वाढतं उत्पन्न आणि संरक्षण निश्चित कालावधी कर्मचाऱ्यांना दिलं जाईल. थेट निवड वाढवून वाढतं कंत्राटीकरण रोखण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे.

नव्या चार कामगार संहितांनुसार  सर्व कामगारांना नियुक्तीपत्र द्यावं लागेल.  लेखी पुरावा असेल ज्यात पारदर्शकता, नोकरीची सुरक्षितता आणि निश्चित रोजगार असेल. 

सामाजिक सुरक्षा संहिता 2020  गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सला सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणलं जाईल. त्या कर्मचाऱ्यांना पीएफ, ईएसआयसी, विमा आणि इतर सामाजिक सुरक्षा लाभ दिले जातील. 

वेतन संहिता 2019 नुसार सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिलं जाईल आणि वेळेवर पगार दिला जाईल. 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी सुविधा दिली जाईल.  

महिलांना सर्व प्रकारचं काम करता येईल. त्या सर्व शिफ्टमध्ये काम करु शकतात. विशेषत : रात्रीच्या शिफ्टला देखील त्या काम करु शकतात. यासाठी त्यांची संमती असणं आवश्यक असेल. याशिवाय सुरक्षेची व्यवस्था केलेली असेल. अधिक पगाराच्या नोकऱ्यांमध्ये  महिलांना उच्च उत्पन्नासाठी समान संधी दिली जाईल.

ईएसआयसीचे लाभ देशभरातील सर्वांना मिळतील. 10 पेक्षा कमी कर्मचारी असणाऱ्या संस्थांसाठी ते ऐच्छिक असेल. मात्र, जोखमीच्या क्षेत्रातील काम असल्यास ईएसआयसीच्या कक्षेत एक कर्मचारी असेल तरी कंपन्या येतील.एक नोंदणी, पॅन, एक परवाना आणि एक रिटर्न अशा सुविधा नव्या संहितेनुसार असतील.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
Embed widget