Dombivli MIDC : डोंबिवलीतील केमिकल कंपन्यांचं होणार स्थलांतर, कामगारांवर उपासमारीची वेळ
ठाणे : मुंबईजवळील डोंबिवली एमआयडीसीत (Dombivali) झालेल्या स्फोटामुळे मुंबईसह महाराष्ट्र हादरला. अमुदान कंपनीतील या भीषण स्फोटात (Dombivli MIDC Blast) 12 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही 9 जण अजूनही बेपत्ता असल्याची महिती आहे. मात्र, स्फोट झालेल्या घटनास्थळी जवळपास 25 ते 30 मानवी अवशेष मिळाले आहेत, त्याची डीएनए तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे बेपत्ता असलेल्यापैकी किती जण मृत आहेत, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आला नाही. मात्र, बेपत्ता असलेल्या व्यक्तींचे नातेवाईक स्फोट झाल्याच्या ठिकाणी व शासन दरबारी मोठ्या आशेने हेलपाटे मारत आहेत. मात्र, या नातेवाईंकांच्या पदरी निराशाच पडत आहे. त्यातच, स्फोटानंतर बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचं पॅन कार्ड (Pan card) घटनास्थळी आढळून आलं. पण, ती व्यक्ती अद्यापही बेपत्ताच आहे. पतीच्या आठवणीने पीडित पत्नीचे डोळे पाणावल्याचं दिसून आलं.
डोंबिवली अमुदान कंपनी स्फोटाला आठवडा उलटून गेला. मात्र, अजूनही नातेवाईक बेपत्ता झालेल्यांचा शोधासाठी अमुदान कंपनीजवळ येतात आणि मोठ्या आशेने आपला बेपत्ता झालेला भाऊ ,पती, नातेवाईक यांचा शोध घेतात. काहीतरी सुगावा लागेल, कुठेतरी दिसून येईल, काहीतरी माहिती मिळेल, या उद्देशाने 8 दिवसांपासून घटनास्थळी नातेवाईक व कुटुंबीयांचे हेलपाटे पाहायला मिळत आहेत. भारत जैस्वाल हेही येथील कंपनीत कामाला गेले आणि ते या स्फोटानंतर आजपर्यंत मिळून आलेच नाहीत. भारत यांचे नातेवाईक मोठ्या आशेने दररोज घटनास्थळी येऊन भारत यांचा शोध घेत आहेत. मात्र, येऊन परत फिरण्याशिवाय त्यांच्याहाती काहीच लागत नाही.