email Hacking : राजेश शिवाजीराव नागवडे नावानं ई-मेल आलाय का? मग सावध व्हा... इकडे लक्ष द्या
तुम्हाला राजेश शिवाजीराव नागवडे नावानं ई-मेल आलाय का? एकदा मेलचा इनबॉक्स तपासा... पण महत्वाचं म्हणजे हा मेल उघडून पाहू नका... कारण पाकिस्तान आणि यूपीतील हॅकर्सनी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाचा पूर्वीचा ई-मेल आयडी हॅक केलाय. याच मेल आयडीवरुन terrorist behind jk attack gunned down in mumbai अशा आशयाचा फिशिंग मेल काही ठिकाणी गेल्याचं उघडकीस आलंय. पण हा मेल म्हणजे हॅकर्सना तुमच्या मेलचा आणि सिस्टमचा पासवर्ड मिळण्याचं एक साधन आहे. त्यामुळे तुमचा ई-मेल आयडी आणि पासवर्डची माहिती घेऊन हॅकर्स त्याचा दुरुपयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजेश शिवाजीराव नागवडे याच्या नावानं आलेला ई-मेल आणि त्यातील पीडीएफ फाईल अजिबात उघडू नका, असं आवाहन सायबर विभागानं केलंय.























