Sangli:किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकास १०० वर्ष पूर्ण,किर्लोस्करांच्या पोस्टाचे पाकिट,तिकिटाचे अनावरण
सांगलीच्या पलूस तालुक्यातील महत्वाच्या किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकाला १०० वर्षे पूर्ण झालीयत... या निमित्तानं किर्लोस्करवाडीमध्ये शतकपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता... यावेळी किर्लोस्कर यांच्या पोस्टाचे पाकिट आणि तिकिटाचे अनावरण करण्यात आले.१५ फेब्रूवारी १९२२ रोजी कुंडल रोड रेल्वे स्थानकाचं नाव बदलून किर्लोस्करवाडी नामकरण करण्यात आलं होतं.. या किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकाला १०० वर्षे नुकतीच पूर्ण झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर, प्रमुख पाहुणे पुणे रेल्वे डी.आर.एम रेणू शर्मा ,चीफ पोस्ट ऑफिसर महाराष्ट्रा विना श्रीनिवास या उपस्थित होत्या























