Haldi Export : भारतीय हळदीला जगभरातून मागणी, विक्रमी निर्यात होण्याची शक्यता
भारतीय हळदीला जगभरातून मागणी वाढत असूून यंदा देशातून हळदीची विक्रमी निर्यात होण्याची शक्यता आहे. साधारणपणे यंदा देशातून 2 लाख टन हळदीच्या निर्यातीचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. भारतीय हळदीला सध्या जगभरातून मागणी वाढली आहे. गेल्या तीन वर्षापासून हळद निर्यातीत भारताचे आकडे वाढत आहेत. कोरोना काळात बाजारपेठा बंद असतानाही देशातून हळदीची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली होती.त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनाही अच्छे दिन आले आहेत. गेल्या वर्षी देशातून 1 लाख 83 हजार 868 टन हळदीची निर्यात झाली होती. तर, यंदाच्या वर्षात जुलैअखेर 1 लाख 53 हजार 154 टन हळदीची निर्यात झाली आहे. त्यामुळे यंदा वर्षअखेपर्यंत दोन लाख टनांहून अधिक हळदीची निर्यात शक्य असल्याचा अंदाज सांगलीच्या कसबे-डिग्रज येथील हळद संशोधन केंद्राने व्यक्त केलाय.



















