Ratnagiri Barsu Refinery : बारसूमध्ये आज प्रशासकीय अधिकारी आणि रिफायनरी विरोधकांमध्ये चर्चा
कोकणातल्या रिफायनरी विरोधातील आंदोलनाचा आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण, रिफायनरी विरोधकांनी केलेल्या मागणीनंतर आज प्रशासन, रिफायनरी विरोधक, रिफायनरी समर्थक, तज्ञ मंडळी यांच्यामध्ये बैठक होणार आहे. दुपारी चार वाजता राजापुरातील तहसील कार्यालयामध्ये ही बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या विरोधकांचा आक्रमकपणा पाहता आजच्या बैठकीतून नेमका काय तोडगा निघणार? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? आणि या बैठकीचे फलित नेमकं काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे. सध्या रिफायनरीचं माती परीक्षण सुरू आहे. त्या विरोधात आंदोलक महिलांनी थेट पोलिसांच्या गाडीसमोर झोपून थांबवण्याचा प्रयत्न केला होता. या बैठकीनंतर रिफायनरीविरोधीतल आंदोलनाची दिशा ठरणार आहे...























