Nilesh Rane vs Bhaskar Jadhav : राणेंच्या ताफ्यावर दगडफेक, जाधवांच्या कार्यालयाबाहेरील राडा Chiplun
रत्नागिरी: भाजपचे नेते निलेश राणे यांच्या गुहागर येथील सभेपूर्वी चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची घटना समोर आली आहे. या राड्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. चिपळूण येथील भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यालयासमोर हा प्रकार घडला. निलेश राणे (Nilesh Rane) याठिकाणी आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्याला भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि राड्याला सुरुवात झाली. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या दिशेने दगड भिरकावले. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना दूर पिटाळले. मात्र, यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या.
![Naresh Mhaske : ठाकरेंचे मुंबईतील आमदार पक्ष सोडणार? नरेश म्हस्केंचं खळबळजनक वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/01/86ddaabe6d1653ebb190b427f21446601735746784828976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rajan Salvi Shiv Sena UBT : ठाकरेंना मोठा धक्का बसणार? राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/01/abb7b6fd172a110180fc6b61f23178a6173572399174590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ratnagiri Jindal Gas Leak : जिंदाल कंपनीतून वायूगळती; 30-40 विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/12/272a7e7ac6735c7974ac4c11fb680caf173400433482390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uday Samant : हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे, पाहा संपूर्ण राडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/07/794660fc1ececaf58e0129a2226e132d172830160666290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uday Samant : वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन, हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/07/3dbd692942bd9b040e1b6b61e2f4c5f7172830109097190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)