शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
Salman Khan Saudi Arabia speech: सलमान खान रियाध (सौदी अरेबिया) येथे झालेल्या ‘जॉय फोरम 2025’ कार्यक्रमात शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासोबत उपस्थित होता.

Salman Khan Saudi Arabia speech: बॉलिवूड अभिनेता भाईजान सलमान खानला (Salman Khan Saudi Arabia speech) पाकिस्तान सरकारने दहशतवादी घोषित केलं आहे. सलमान खानचं नाव दहशतवाद विरोधी कायद्याच्या ‘चौथ्या अनुसूची’त (4th Schedule) समाविष्ट करण्यात आलं आहे. सलमान खानने सौदी अरेबियातील कार्यक्रमात दिलेल्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान सलमानवर कायदेशीर कारवाई करू शकतो.
वाद कसा सुरू झाला? (Salman Khan Balochistan remark)
सलमान खान रियाध (सौदी अरेबिया) येथे झालेल्या ‘जॉय फोरम 2025’ कार्यक्रमात शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासोबत उपस्थित होता. मध्यपूर्वेत भारतीय चित्रपटांची लोकप्रियता सांगताना तो म्हणाला की, “इथं बलुचिस्तान, अफगाणिस्तान, अगदी पाकिस्तानमधीलही लोक आहेत. सर्वजण येथे काम करत आहेत.” या वक्तव्यात त्याने बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा वेगळा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, हे सलमानचं ‘जीभ घसरल्यामुळे’ झालेलं वक्तव्य की हेतुपूर्वक केलं यावर चर्चा सुरू झाली. आतापर्यंत सलमान किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
पाकिस्तानची भूमिका (Pakistan on Salman Khan Remark)
पाकिस्तान सरकारने सलमान खानच्या वक्तव्याला देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला मानले आहे. यामुळेच सरकारने त्याला दहशतवादी म्हणून घोषित करत, त्याचं नाव 1997 च्या दहशतवाद विरोधी कायद्याच्या चौथ्या अनुसूचीमध्ये टाकले आहे. या कायद्यानुसार संबंधित व्यक्तीवर कडक पाळत ठेवली जाते, तसेच त्यांच्या हालचालींवर निर्बंध येतात.
बलुचिस्तानकडून समर्थन (Balochistan on Salman Khan)
दुसरीकडे, सलमान खानच्या वक्तव्यावर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एका बलोच नेत्याने सार्वजनिकरित्या सलमानचे आभार मानत म्हटले की, “या विधानामुळे साठ दशलक्ष बलोच नागरिकांना आनंद झाला आहे. हे वक्तव्य बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळावी, हा संदेश जगाला देते.” बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत असून, तिथे दीर्घकाळापासून स्वातंत्र्याची चळवळ सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























