एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol: रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर आणखी एक सनसनाटी आरोप, गोखलेंसाठी केंद्रीय मंत्रि‍पदाचा गैरवापर, नेमकं काय घडलं?

Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol: जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. गोखले बिल्डर्सशी भागीदारी असल्याचा आरोप

Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्री व्यवहारावरुन शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून दिली होती. रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण थेट पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यापर्यंत नेले आहे. धंगेकरांच्या या आरोपांमुळे मुरलीधर मोहोळ यांच्या कारभाराबाबत अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. अशातच आता रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर आणखी एक सनसनाटी आरोप केला आहे. मोहोळ यांनी त्यांच्या केंद्रीय उड्डाण राज्यमंत्रिपदाचा विशाल गोखले (Vishal Ghokhale) यांच्यासाठी गैरवापर केला. केंद्रीय मंत्री असलेल्या मोहोळ यांनी विशाल गोखले यांना हवाई प्रवासासाठी अत्यंत स्वस्त दरात प्रायव्हेट जेट उपलब्ध करुन दिले होते. या प्रायव्हेट जेटच्या वापरासाठी विशाल गोखले यांना एरवी 200कोटी रुपये भरावे लागले असते. मात्र, मुरलीधर मोहोळ यांनी हस्तक्षेप केल्यामुळे  फक्त 2.30 कोटींमध्ये तडजोड झाली.  या सगळ्यामुळे मुंबई फ्लाईंग क्लबचे तब्बल 197 कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या श्री. विशाल गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री श्री.मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही. केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत यापूर्वी देखील एका प्रकरणात मोठी अनियमित केली असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर प्रकरणात ज्या कंपनीला फायदा करून दिला त्या कंपनीने मुरलीधर मोहोळ यांचा व्यावसायिक भागीदार अशी ओळख असलेल्या श्री.विशाल गोखले यांना विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी  प्रायव्हेट जेट देखील उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आले आहे.

जुहू विमानतळावरून आपले ऑपरेशन्स चालवणाऱ्या बॉम्बे फ्लायिंग क्लबकडून एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ला देय (भरणा) असलेल्या रकमेच्या वसुली ,थकबाकीबाबत लेखापरीक्षण अहवाल आणि अंतर्गत अंदाजांनुसार नमुद केल्याचे आढळून आले आहे. नियमानुसार क्लबकडून व्यावसायिक दरांनुसार शुल्क आकारले गेले असते, तर सुमारे एकूण थकबाकी  ₹200 कोटींची  वसुली करणे अपेक्षित होते . परंतु केंद्रीय राज्यमंत्र्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागामुळे  हे प्रकरण केवळ ₹2.30 कोटींमध्ये तडजोड करण्यात आलेली असल्याचे दिसून येत आहे.

श्री.मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मुंबई फ्लाईंग क्लबवर दाखवलेल्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचे सुमारे 197 कोटी रुपयांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून ज्या क्लबला याचा फायदा मिळवून दिला त्या मुंबई फ्लाईंग क्लबने विशाल गोखले यांच्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवले होते.यामागे नेमकी कोणत्या प्रकारच्या कामाची दलाली श्री.विशाल गोखले मार्फत केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे हा तपासाचा विषय आहे. याबाबत श्री मुरलीधर मोहोळ यांनीच खुलासा करावा. सोबत संबंधित क्लबच्या प्रायव्हेट जेटने विशाल गोखले यांचा कुंभमेळाव्याचा व्हिडिओ शेअर करत आहे.

आणखी वाचा

'एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद वाचवा', मुरलीधर मोहोळांना भाजपश्रेष्ठींनी फायनल वॉर्निंग दिल्याचा धंगेकरांचा दावा

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tejashwi Yadav : हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Bihar Results 2025 : यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
Alinagar Election Result Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde on Bihar Result : बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारुन विकास राज स्वीकारलं
Delhi BJP Celebration : NDA ला बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, दिल्लीत जोरदार सेलिब्रेशन
PM Modi Full Speech Bihar Result : युवकांनी बिहारमधील जंगलराज संपवलं, विजयानंतरचं मोदींचं पहिलं भाषण
J. P. Nadda Delhi Speech मोदींची हॅट्रीक,बिहारच्या विजयानंतर जे. पी नड्डा यांचं भाजप मुख्यालयात भाषण
PM Modi On Bihar Result : NDA च्या विजयाने MY म्हणजे महिला आणि युवा हा नवा फॉर्म्युला बनला - मोदी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejashwi Yadav : हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Bihar Results 2025 : यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
Alinagar Election Result Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले
नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले
एकीकडे बिहारमध्ये भाजप युतीचा मोठा विजय, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी
एकीकडे बिहारमध्ये भाजप युतीचा मोठा विजय, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी
MIM Bihar MLA List : गेल्यावेळी आमदारांनी अर्ध्यात साथ सोडली, ओवेसींनी बिहारमध्ये पुन्हा ताकद लावली, एमआयएमचे नव्या विधानसभेत किती आमदार?
गेल्यावेळी आमदारांनी अर्ध्यात साथ सोडली, ओवेसींनी बिहारमध्ये पुन्हा ताकद लावली, एमआयएमचे नव्या विधानसभेत किती आमदार?
Vaibhav Suryavanshi : रायझिंग स्टार टी 20 चषकात वैभव सूर्यवंशीचं वादळ, अवघ्या 42 चेंडूत 144 धावा, 11 चौकार आणि 15 षटकारांचा पाऊस
Vaibhav Suryavanshi : रायझिंग स्टार टी 20 चषकात वैभव सूर्यवंशीचं वादळ, अवघ्या 42 चेंडूत 144 धावा, 11 चौकार आणि 15 षटकारांचा पाऊस
Embed widget