एक्स्प्लोर
Nalasopara Drug : नालासोपाऱ्यात 14 कोटींची MD Drugs फॅक्टरी उद्ध्वस्त, Mumbai Police ची मोठी कारवाई!
नालासोपाऱ्यात (Nalasopara) मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १४ कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्ज (MD Drugs) फॅक्टरीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी नालासोपारा पूर्वेकडील पेल्हार येथील रशीद कंपाऊंडमधील एका कारखान्यावर छापा टाकून सुमारे सात किलो एमडी ड्रग्ज जप्त केले, ज्याची किंमत अंदाजे १४ कोटी रुपये आहे. या कारवाईत पोलिसांनी १ कोटी रुपयांचा कच्चा मालही जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी चार जण मुंबईचे तर एक नालासोपारा येथील रहिवासी आहे. या मोठ्या कारवाईमुळे नालासोपारा परिसर अमली पदार्थांचे केंद्र बनत चालल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion















