Konkan Refinery Survey कोकणातील रखडलेला रिफायनरीचा सर्व्हे पुन्हा करणार, दीड हजार पोलिसांचा फौजफाटा
कोकणात राखडलेला रिफायनरीचा सर्व्हे पुन्हा सुरू केला जाणार आहे. सोमवारपासून हा रिफायनरीचा सर्व्हे राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव जवळ असलेल्या गोवळ या गावातल्या सड्यांवरती होणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची पूर्ण तयारी झाली असून सर्व्हे करण्यासाठी थेट राज्य सरकारने आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. एकंदरीत या ठिकाणी होणारा विरोध पाहता पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे. जवळपास दीड हजार पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. तुझ्या पोलिसांची राहण्याची सोय म्हणून माडबन येथे अणुऊर्जा प्रकल्पाचे तीन हॉल किंवा खोल्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुख्य गोष्ट म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार 23 एप्रिल 2023 ते 31 मे 2023 यादरम्यान हे हॉल पोलिसांसाठी राखीव असू शकतात अशी माहिती आहे. HPCL, HP, आणि BPCL या कंपन्यांसाठी म्हणजेच या कंपन्यांच्यावतीने संयुक्तरीत्या राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव ज्या ठिकाणी हे रिफायनरी उभारली जाणार आहे. सध्या सर्व्हे होत असलेल्या ठिकाणी उभारली जाणारी रिफायनरी ही एका वर्षी 20 दशलक्ष मेट्रिक टन इतकं कच्चं तेल शुद्ध करणार आहे. म्हणजेच 20 तास लक्ष मॅट्रिक टन इतक्या क्षमतेची असणार आहे. यापूर्वी वेळोवेळी झालेल्या विरोधामुळे या रिफायनरीचा कामकाज पुढे सरकू शकले नव्हतं. पण सोमवारपासून ते पुन्हा सुरू होणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवरती रिफायनरी विरोधकांनी देखील पूर्ण तयारी केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी विरोध देखील मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. त्यामुळे पोलीस ही संपूर्ण परिस्थिती कशी हाताळतात? हे पहावं लागेल. मुख्य गोष्ट म्हणजे आंदोलनादरम्यान काही अघटीत झाल्यास त्याला जिल्हाधिकारी आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जबाबदार असतील असा व्हिडिओ विरोधकांनी यापूर्वी जारी केला आहे.