ABP Majha Headlines : 09 PM एबीपी माझा हेडलाईन्स : 14 July 2024 : Marathi News
ABP Majha Headlines : 09 PM एबीपी माझा हेडलाईन्स : 14 July 2024 : Marathi News
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळ दरड कोसळल्यानं कोकण रेल्वेला फटका, अनेक ट्रेन चार ते पास तासांपासून रखडल्या
चिपळूण शहरात वाशिष्ठी नदीचं पाणी शिरलं, प्रशासन अलर्ट मोडवर, NDRFची टीम तैनात
कोकणात मुसळधार पावसामुळे नद्या ओसंडून वाहू लागल्या...अनेक रस्ते पाण्याखाली, रत्नागिरी जिल्ह्यात उद्या शाळा-कॉलेजना सुट्टी जाहीर
मुंबई-नाशिक महामार्गावर आसनगाव परिसरात आठ ते दहा किलोमीटरची वाहतूक कोंडी, मोठमोठे खड्डे आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे हजारो प्रवाशांचे आतोनात हाल
बारामतीतून फोन आल्यानं विरोधक सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत, छगन भुजबळांचा शरद पवारांवर थेट आरोप...भुजबळांकडे पुरावा काय, सुप्रिया सुळेंचा सवाल...
मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी फडणवीसांचा दबाव, जरांगेंचा आरोप...जरांगेंनी गैरसमज करू नये, शंभूराज देसाईंचं आवाहन...
विधानसभा निवडणुकी आधी बरेच हौशे-नवशे-गवशे तुम्हाला आश्वासनं देतील पण त्यांना भुलू नका, बारमतीच्या जनसन्मान मेळाव्यामध्ये भर पावसात अजित पवारांचं वक्तव्य