(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PUNE : दिल्लीला मुंबईतील नरिमन पॉईंटशी जोडण्याचा मानस, नितीन गडकरींच्या आणखी काय योजना?
केंद्रीय मंत्री गडकरी पुण्यात म्हणाले की, पुण्यात मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. पुण्यातील एअरपोर्टसाठी संरक्षण विभागाकडून जागा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी संरक्षण विभागाकडून चंदीगडच्या आणि पुण्याच्या जागेची अदलाबदल करण्यात येईल. त्याला मंजुरी मिळालीय. पुण्यातील नदी प्रकल्पालाही मंजुरी मिळालीय. पुण्यातही नागपुरप्रमाणे वाघोली ते शिरुर हा रस्ता पन्नास हजार कोटी खर्च करून बांधण्याचा विचार. हा रस्ता तीनमजली असेल. हे काम तीन मजल्याचे असेल. दोन मजले उड्डाणपूलाचे तर शेवटचा तिसरा मजला मेट्रोसाठी असेल. यासाठी मदत करण्यास केंद्र तयार आहे, राज्याने त्यासाठी जी एस टी माफ करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले की, मुंबईत नरिमन पॉईंटला दिल्लीला जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी राज्य सरकार सोबत लवकरच बैठक घेणार आहे. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते सोलापूर, पुणे ते बारामती अशा ज्या ज्या ठिकाणी ब्रॉडगेज रेल्वे आहे तिथे मेट्रो चालवता येईल. याचे तिकिट रेल्वेच्या तिकीटाएवढे राहील. या मेट्रोला दोन मिलगाडीचे डबे असतील. ज्यामधून दुध, फळे यांची वाहतूक होईल. ही मेट्रो खाजगी व्यवसायिकांना चालविण्यास द्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
गडकरी म्हणाले की, अजित पवारांनी ठरवलं तर पुण्याला सर्व प्रकारच्या प्रदूषणातुन मुक्त करु शकतात. पुणे- बंगलोर एक्स्प्रेस वे चाळीस हजार कोटी खर्च करून बांधणार आहोत. या एक्स्प्रेस वे च्या शेजारी नवीन पुणे वसवावे, असंही ते म्हणाले.