Pune Rain Update : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात
Pune Rain Update : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात
पुणे शहरात आज पुन्हा एकदा पावसाने दमदार हाजरी लावली आहे. आज सकाळपासून पुणे शहरात ढगाळ वातावरण होतं आणि आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. जर आपण बघितलं तर पुणे शहरात सध्या अनेक रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात देखील झालेली आहे. गेले 15 ते 20 मिनिट पुणे शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे फक्त पुणे शहरातच नाही तर धरण क्षेत्रामध्ये असेल ग्रामीण भागात असेल तिथे देखील मोठ्या प्रमाणात अशाच पद्धतीने पाऊस सुरू झालेला आहे. जर आपण बघितलं तर सकाळपासून जे लोक बाहेर पडलेले आहेत ते हातात. घेऊन आणि गाड्या देखील काही प्रमाणात घसरतायत, स्लिप होतायत. आपण बघतोय रस्त्यावर पाणी देखील चाचायला सुरुवात झालेली आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर सध्या पाणी साचलेल चित्र पाहायला मिळतय. आज जर आपण बघितलं तर वातावरण देखील पुण्यामध्ये बदललेला आहे आणि सकाळपासून अशा पद्धतीने पुणे शहरात पावसाला सुरुवात झालेली आहे. आज सुट्टीचा दिवस आहे, रविवार आहे आणि त्यामुळे पुणेकर या पावसाचा आनंद देखील घेताना दिसतायत. आता आपण शहराच्या मध्यवर्ती भागात आहोत. आणि या ठिकाणी देखील आपण बघू शकतो की पावसाला या ठिकाणी जोरदार सुरुवात झालेली आहे आणि असाच पाऊस ग्रामीण भागामध्ये आणि धरण क्षेत्रामध्ये देखील सुरू आहे आणि हवामान खात्या करून जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पावसाचा त्यानुसार पुढील आणखीन दोन ते तीन दिवस असाच पाऊस राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय.























