Pune Rains : पुण्यात मुसळधार पाऊस, अनेक घरात शिरलं पाणी आमदार Madhuri Misal यांची प्रतिक्रिया
Pune Rains : पुण्यात मुसळधार पाऊस, अनेक घरात शिरलं पाणी आमदार Madhuri Misal यांची प्रतिक्रिया पुणे: पुणे शहरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. खडकवासला धरणातून 40000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने मुठा नदीला पूर (Pune Heavy Rain) आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. पूलाची वाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार पाण्यावर तरंगताना दिसत आहे. तर सिंहगड रोडवरील एका सोसायटीत छातीपर्यंत पाणी साठल्याने (Pune Water Logging) इमारतीमधील नागरिकांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू बोटी मागवण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.























