Marathi Actress Gayatri Datar Engaged: अभिनेत्री गायत्री दातार पडलीय प्रेमात; गुपचूप उरकला साखरपुडा, होणाऱ्या अहोंचा फोटो शेअर करत म्हणाली...
Marathi Actress Gayatri Datar Engaged: मराठी अभिनेत्री गायत्री दातारनं तिच्या आयुष्यातल्या खऱ्याखुऱ्या हिरोसोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच, तिनं फोटो शेअर करताना तिनं साखरपुडा उरकल्याचीही माहिती दिली आहे.

Marathi Actress Gayatri Datar Engaged: मनोरंजन विश्वात सध्या लगीनसराई सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच तेजस्विनी लोणारीनं (Tejaswini Lonari) शिवसेनेच्या (Shiv Sena) बड्या नेत्याच्या मुलासोबत लग्नगाठ बांधली, तर महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकरांच्या (Aadesh Bandekar) लेकानंही अभिनेत्री पूजा बिरारीसोबत (Pooja Birari) लग्नगाठ बांधली. अशातच आता आणखी एका मराठी अभिनेत्रीचं (Marathi Actress) ठरलंय, अशी माहिती मिळतेय. 'तुला पाहते रे' (Tula Pahate Re) फेम अभिनेत्री गायत्री दातार (Actress Gayatri Datar) हिनं जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. गायत्रीनं तिच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. तसेच, तिनं गूड न्यूज शेअर करताना एक क्युट फोटोही शेअर केला आहे.
मराठी अभिनेत्री गायत्री दातारनं तिच्या आयुष्यातल्या खऱ्याखुऱ्या हिरोसोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच, तिनं फोटो शेअर करताना तिनं साखरपुडा उरकल्याचीही माहिती दिली आहे. त्यासोबतच तिनं तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये साखरपुड्याची अंगठी फ्लॉन्ट केली आहे. गायत्रीनं फोटो शेअर करताना एक कॅप्शनही दिलं आहे.
View this post on Instagram
गायत्री दातारच्या कॅप्शननं वेधलं लक्ष
"माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झाली आहे. हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवस आहे", असं गायत्रीनं कॅप्शनमध्ये लिहिलंय. तसेच, त्याच कॅप्शनमध्ये गायत्रीनं 11 डिसेंबरला साखरपुडा उरकल्याचीही माहिती दिलीय. आता लवकरच गायत्रीची लगीनघाई सुरू होणार आहे. गायत्रीनं सोशल मीडियावर तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटो शेअर केला आहे. मात्र, या फोटोमध्ये गायत्रीच्या आयुष्यातला तो नेमका कोण आहे? हे मात्र समजत नाहीय. त्याचं नावही अभिनेत्रीने गुलदस्त्यात ठेवलं आहे.
गायत्री दातारनं शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहेत. मराठी मनोरंजन विश्वात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री गायत्री दातारनं झी मराठीवरच्या 'तुला पाहते रे' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलंय. त्यानंतर 'अबीर गुलाल' मालिकेत दिसलेली. 'बिग बॉस मराठी' आणि 'चल भावा सिटीत' या रिअॅलिटी शोमध्येही गायत्री दातार झळकलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























