एक्स्प्लोर
Pune : PMPML च्या चालकानं स्पीड ब्रेकरवर बस आदळली,प्रवाशाच्य़ा मणक्याला दुखापत ABP MAJHA
भरधाव वेगानं पीएमपी (Pune PMP Latest Update) चालवणं एका चालकाला चांगलंच महागात पडलं आहे. पुण्यात भरधाव वेगात जाणारी पीएमपी बस जोरात आदळल्याने एका प्रवाशाच्या मणक्यात गॅप पडला आहे. या घटनेनंतर त्या प्रवाशानं सरळ पोलिस स्टेशन गाठलं आणि त्या चालकाविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी संबंधित चालकावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अस्लम कादर शेख असं गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. प्रवाशी राजू मोतीराम चिंचवडकर (वय 62) यांनी याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion
















