Omicron Varient: "पुण्यात निर्बंध पुन्हा कडक करणार" निर्बंध घालण्याबाबत अजित पवाराचं मोठं वक्तव्य
पुणे : कोरोना महामारीला (Corona) आटोक्यात आणण्यासाठी मागील बऱ्याच काळापासून जगभरात अनेक उपाय-योजना सुरु आहेत. भारतातही युद्धपातळीवर लसीकरण सुरु आहे. पण या सर्वामध्येच आता दक्षिण आफ्रिका देशात एक नवा कोरोना व्हेरियंट (Omicron Varient) जन्माला आल्याने सर्व जगाचे टेन्शन वाढले आहे. नव्या उपाययोजनां घेऊन प्रशासन सज्ज झालं असून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही पत्रकार परिषद घेत पुणेकरांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
पुण्यातील परिस्थितीबाबत सांगताना पवारांनी महत्त्वाची माहिती देण्यासह निर्बंध घालावे लागू शकतात, तसंच परिस्थिती पाहून पुढील उपाययोजना आखल्या जातील असंही म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांसोबत ऑनलाईन बैठकीत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.





















