Devendra Fadanvis On Indrayani River Accident : इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
Devendra Fadanvis On Indrayani River Accident : इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
Pune River Bridge Collapses : रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी
रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते. काही जण पुलावर उभारले होते. तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये नेमके किती जण बुडाले आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. अंदाजे 20 ते 25 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
Indrayani River Bridge Collapses : वाहून गेलेल्यांमध्ये लहाण मुलांचाही समावेश
कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवर एक जुना पूल आहे. या पुलावर अनेक पर्यटक उपस्थित होते. सुट्टीचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होती. त्यातच हा पूल कोसळल्याने अनेक जण वाहून गेले. यामध्ये काही लहान मुलेही असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कुंडमळामध्ये ही दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी एनडीआरएफचे पथक दाखल झालं असून बचाव कार्य सुरू आहे. तसेच या ठिकाणी अग्निशमन दलही पोहोचल्याची माहिती आहे. या ठिकाणी अजूनही काही पर्यंटक अडकले आहेत, त्यांना वाचवलं जात आहे. या ठिकाणी गर्दी करु नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
Pune Bridge Collapses : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नाही
कुंडमळा हे ठिकाण पर्यटनस्थळ असून हे ठिकाण धोकादायक असल्याचं सांगितलं जातय. पावसाळ्यात, विशेषतः शनिवार आणि रविवारी या ठिकाणी पर्यंटक मोठी गर्दी करतात. या ठिकाणी नदीवर जुना पूल आहे. त्याचीही डागडूजी करण्यात आली नाही. असं असलं तरी प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
पुणे परिसरात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रवाहही मोठा आहे. असं असूनही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.























