Facebook Post : Laxman Jagtap यांचे पुत्र Aaditya Jagtap यांची फेसबुकवर एक भावनिक पोस्ट
चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचा मुलगा आदित्य जगतापने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट टाकली आहे. "जगातील कोणतीही शक्ती आम्हाला वेगळे करू शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत." असा आशय आणि सोबत कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटो ही अपलोड केलेले आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी आणि भाऊ शंकर यांच्यात उमेदवारीवरून वाद असल्याचे समोर आले. लक्ष्मण जगतापांच्या निधनाला एक महिना उलटताना कुटुंबातील हा वाद चिंतेचा विषय ठरलाय. त्याचनुषंगाने लक्ष्मण जगतापांच्या मुलगा आदित्यने फेसबुकवर कुटुंबाच्या फोटोसह "जगातील कोणतीही शक्ती आम्हाला वेगळे करू शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत." असा आशय पोस्ट केला आहे. आदित्यच्या या भावनिक पोस्टनंतर या वादावर पडदा पडेल, अशी सर्वानाच आशा आहे.























