Ravindra Dhangekar Meet Shailesh Tilak : रवींद्र धंगेकर यांनी टिळक कुटुंबियांची घेतली भेट :ABP Majha
विधानसभेच्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज तीन उमेदवार अर्ज भरणार आहेत. भाजपकडून चिंचवडसाठी अश्विनी जगताप तर कसब्यासाठी हेमंत रासने अर्ज भरणार आहेत. काँग्रेसकडून कसब्यासाठी रवींद्र धंगेकरांचं नाव अधिकृतरित्या अद्याप जाहीर झालेलं नसलं तरी, काँग्रेसचा उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहे. चिंचवडमधून राष्ट्रवादीच्या राहुल कलाटे यांचं नाव आघाडीवर आहे, मात्र त्यांच्या नावाची अजून घोषणा झालेली नाहीय. दरम्यान, आज अर्ज दाखल करताना भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरा-समोर येण्याची शक्यताय. कारण, कसबा येथे आज भाजप आणि कॉंग्रेसचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी भाजप आणि कॉंग्रेस अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकाचवेळेस म्हणजे सकाळी 9.30 वाजता कसबा गणपती मंदिरासमोर जमण्यास सांगण्यात आलय. त्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. यावेळी भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तर कॉंग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत.