Eknath Shinde Bag Checking | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाही
Eknath Shinde Bag Checking | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाही
हे देखील वाचा
Ajit Pawar in Baramati: बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
बारामती: आगामी काळात बाकीच्यांचं वय बघता मलाच या बारामतीचं सगळं बघायचं आहे, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काम करत नाही. मी फुशारक्या मारत नाही, तर माझं काम सगळं सांगतं. लोकसभेला जो निर्णय घ्यायचा होता. तुम्ही घेतला आताची निवडणूक माझ्या भवितव्याच्यादृष्टीने महत्त्वाची आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले. ते बुधवारी लोणी भापकर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत राजकीय फटकेबाजी केली.
काल पंतप्रधान मोदींची सभा झाली. त्यांनी कुणावर टीका केली नाही. मागच्यावेळी केली तर गडबड झाली. आता फक्त विकासावर बोलले. लोकसभेला पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या. आता पण सांगतात साहेबांची शेवटची निवडणूक आहे नातवाकडे लक्ष द्या. आयला अवघडच आहे. मी पण पुतण्या आहे ना? मुलगी झाली की थेट नातूच काढला. मुलासारखाच आहे ना? मुलगी झाल्यावर साहेबांना नातू काढला, मी पण पुतण्या आहे ना?, असे अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार बुधवारी बारामती तालुक्यातील लोणी भापकर, जळगाव कडेपठार आणि मेदड या तीन गावांचा दौरा करत आहेत.