Maharashtra Politics :शिवसेनेतील संघटनात्मक निवड ही निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच,ठाकरे गटाचा दावा
निवडणूक आयोगासमोर काल झालेल्या सुनावणीत शिंदे गटानं उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुखपद बेकायदेशीर असल्याचा दावा केला आणि यावरुन जोरदार घमासान झालं... आता याप्रकरणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे... कारण २०१८ साली झालेली शिवसेनेतील संघटनात्मक निवडीची निवडणूक ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच झाली आहे असा दावा आता ठाकरे गट करणार आहे... यासाठी निवडणूक आयोगानं त्यावेळी शिक्कामोर्तब केलेली कॉपी पुरावा म्हणून देणार आहे... यावर त्यावेळेचे निवडणूक अधिकारी ज्यांची नियुक्ती या सगळ्या निवडणूक प्रक्रियेसाठी केली होती... त्या अॅडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांची देखील सही आहे... या निवडणुकीबाबत २०१७च्या डिसेंबर महिन्यात पूर्वसूचना देऊन प्रतिनिधी सभेच्या सदस्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं... तर पक्षप्रमुख पदासाठी मागवलेल्या अर्जांमध्ये केवळ एकच अर्ज आला होता.. या सर्व प्रक्रियांचे तपशील निवडणूक आयोगाला विहित नमुन्यात सादर केल्याचाही दावा ठाकरे गटानं केलाय...