Bhavana Gawali : 12 आमदारांच्या गर्दीत भावना गवळींची शपथ जय एकनाथमुळे गाजली!
Legislative Council MLAs swearing ceremony : विधानपरिषद निवडणुकीत (Vidhanparishad Electon) निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व 11 आमदारांचा शपथविधी सोहळा (MLAs swearing ceremony) आज संपन्न झाला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेदेखील उपस्थित होते. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडणूक आले होते. तर शेकपाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत महायुतीने 9 जागा जिंक्ल्या तर महाविकास आघाडीने 2 जागा जिंकल्या होत्या, 12 उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमका कोण विजयी होणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्याचं प्रथमदर्शन दिसून येत आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भाजप महायुतीचा वरचष्मा दिसून आला होता.
![Raigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/24f746dffab503059acf6870981571b01739262741267718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Suresh Dhas PC : जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याच कळतं का? धस यांचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/dd49fa174784ed744dbb96439e80019f1739262206703718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Cotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/8d2b999b37b3302c25a4619fbe4607731739252455474718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/873ef5e1e9769a8cba5632f364a73fff1739204793104977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manipur CM Biren Singh : एन.बिरेन सिंह यांचा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदावरुन राजीनामा, कारण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/1ef0a79446b0cde5383396a0271dda2517391101163601000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)