Manoj Jarange Mumbai Vidhan Sabha | मुंबईत 23 जागांवर उमेदवार पाडण्याचा जरांगेंचा निर्धार?
Manoj Jarange Mumbai Vidhan Sabha | मुंबईत 23 जागांवर उमेदवार पाडण्याचा जरांगेंचा निर्धार?
हे देखील वाचा
दिवाळीचा फराळ अन् पाकिटात 3000 रुपये; रोहित पाटलांच्या मतदारसंघात गोंधळ, व्हिडिओ व्हायरल
सांगली : विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराला सुरुवात झाली असून दिवाळीच्या गाठीभेटी व फराळाच्या माध्यमातून नेतेमंडळीही ग्रामस्थांपर्यंत पोहोचत आहेत. दुसरीकडे बड्या नेत्यांच्या सभांचं नियोजन होत असून त्यांचे दौरे ठरल्याचं पाहायला मिळत आहे. तर, उमेदवारांकडून मतदारसंघातील गाव ते गाव आणि डोअर टू डोअर प्रचारालाही सुरुवात झाली आहे. दरम्यान, रोहित पाटील (Rohit patil) उमेदवार असलेल्या कवठेमहंकाळ मतदारसंघातील तासगाव शहरात रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदाराना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटतानाचा प्रकार घडल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार व माजी खासदार संजयकाका पाटील गटाने केला आहे. या घटनेमुळे मतदारसंघात मोठा गोंधळ उडाला असून आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रारीसाठी (Police) पाटील गटाचे समर्थक ठाण मांडून बसले आहेत.