Devendra Fadanvis on Ajit Pawar : सिंचन घोटाळ्यातील आरोप सत्य, मात्र अजित पवार दोषी नाहीत : फडणवीस
सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य ,पण अजित पवार दोषी नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका मुलाखतीत वक्तव्य. अजित पवार केवळ त्या खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार होते, तपासात मात्र अजित पवारांविरुद्ध पुरावा मिळाला नाही. फडणवीसांचं वक्तव्य.
हे व्हिडिओ पाहा
Karale Master Full Speech Manmad : 4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा
4 तारखेला अजित पवारांची घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा, असे आवाहन नितेश कराळे मास्तर यांनी केलं आहे. मनमाडमध्ये त्यांची काल जाहीर सभा पार पाडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. पुढे नितेश कराळे मास्तर म्हणाले की, "मोदींनी आपला उमेदवारी अर्ज भरताना 3 कोटी रूपये संपत्ती असल्याचं सांगितलं. 3 कोटी रुपयांचे कोणी फकीर असतो का?" असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुढे कराळे मास्तर यांनी देशातील हायवेवरून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "01 किलोमीटर रस्ता बांधण्यासाठी 18 कोटी खर्च येतो तर मोदींना त्यासाठी 251 कोटी खर्च केले" असा लेखाजोखा देखील त्यांनी यावेळी मांडला.