Karale Master Full Speech Manmad : 4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा
Karale Master Full Speech Manmad : 4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा
4 तारखेला अजित पवारांची घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा, असे आवाहन नितेश कराळे मास्तर यांनी केलं आहे. मनमाडमध्ये त्यांची काल जाहीर सभा पार पाडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. पुढे नितेश कराळे मास्तर म्हणाले की, "मोदींनी आपला उमेदवारी अर्ज भरताना 3 कोटी रूपये संपत्ती असल्याचं सांगितलं. 3 कोटी रुपयांचे कोणी फकीर असतो का?" असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुढे कराळे मास्तर यांनी देशातील हायवेवरून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "01 किलोमीटर रस्ता बांधण्यासाठी 18 कोटी खर्च येतो तर मोदींना त्यासाठी 251 कोटी खर्च केले" असा लेखाजोखा देखील त्यांनी यावेळी मांडला. या भाषणात कराळे मास्तर यांनी तुफान फटकेबाजी करत सर्वांना खळखळून हसवलं.