(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar Potholes : अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, स्थानिकांचे हाल ABP Majha
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून याचा मोठा फटका येथील स्थानिक नागरिक तसच वाहन चालकांना सहन करावा लागतोय. गुजरात सीमेपासून मुंबईपर्यंत चारोटी , खानिवडे आणि दहिसर अशा तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टोल वसुली केली जात असली तरी सुद्धा या महामार्गाच्या देखभाल दुरुस्ती कडे दुर्लक्ष केल जात असल्याच चित्र आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून देखभाल दुरुस्तीचा ठेका असलेल्या कंपनीकडून खड्डे बुजवले जात नसल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय . गुजरात सीमेपासून मुंबईच्या दहिसर टोल नाक्यापर्यंत आर के जैन या कंपनीला देखभाल दुरुस्तीचा ठेका दिला असून यासाठी तब्बल 26 कोटी रुपये निधी वर्षभराच्या देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आला आहे . मात्र तरीसुद्धा या कंपनीकडून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतलं जात नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने सुद्धा झोपेचं सोंग घेतलं आहे का ? असा सवाल वाहन चालकांकडून उपस्थित केला जातोय .