एक्स्प्लोर

Oxygen Express reached Nashik | 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' नाशकात दाखल

Oxygen Express in Nashik विशाखापट्टणमहून निघालेली 'ऑक्सिजन एक्सप्रेस' अखेर (आज) शनिवारी नाशिकला पोहोचली आहे. यामुळं राज्याला एक मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच ऑक्सिजचा तुटवडा जाणवू लागल्यामुळं आरोग्य विभाग आणि प्रशासनापुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. पण, नाशिकला आता ही ऑक्सिजन एक्स्प्रेस आल्यामुळं एक प्रकारे काही अंशी दिलासाच मिळत आहे. 

नाशिकला आलेल्या या एक्स्प्रेसमध्ये ऑक्सिजनचे एकूण 4 टँकर आहेत. यापैकी 2 टँकर नाशिक जिल्हा आणि 2 नगर जिल्ह्याला पाठवण्यात येणार आहेत. नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णालयांमध्ये बेडही उपलब्ध होत नाही आहेत. तर, काही रुग्णालय व्यवस्थापनांकडून रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासही सांगण्यात येत आहे. 

नाशिक जिल्ह्यात सध्याच्या घडीला साडेसात ते आठ हजार रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. या धर्तीवर दररोज जवळपास 140 मेट्रिक टनच्या घरात ऑक्सिजनचा पुरवठा होणं आवश्यक आहे. पण, सध्या फक्त 85 मेट्रिक टन ऑक्सिजनचाच पुरवठा होत आहे. ही तफावत फार मोठी असल्यामुळं रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करायचा तरी कसा, हाच प्रश्न प्रशासनाला पडतो. 

नाशिकमध्ये आलेल्या या ऑक्सिजन टँकरपैकी दोन टँकर एकट्या नाशिक जिल्ह्याला मिळणार आहेत. म्हणजेच इथं एकूण  50 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. हा पुरवठा साधारण एक दिवस पुरेल इतकाच आहे. पण, अडचणीच्या या प्रसंगी हा पुरवठाही महत्त्वाचा ठरत आहे, ज्यामुळं यंत्रणांना किमान दिलासाही मिळाला आहे. 

नाशिक व्हिडीओ

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात?
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
Embed widget