Nashik Rain Update | गंगापूरमधून विसर्ग सुरू, Godavariला पूर; Ganpati आगमनापूर्वीच मंदिरांना वेढा
नाशिक शहर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे गंगापूरसह इतर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. संध्याकाळपासून सुरू असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गोदाकाठावरील मंदिरांना पाण्याने वेढा देण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी दिवसभर नाशिक शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू होती. यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपात्रामध्ये पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गंगापूर धरणातून सकाळपासून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जात होता. सायंकाळी सात वाजता हा विसर्ग वाढवण्यात आला. सध्या तीन हजार पंचवीस क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गणपती बाप्पाचे आगमन काही तासांवर आले आहे. त्याआधीच नाशिकमध्ये वरुणराजाची कृपादृष्टी आहे. काही ठिकाणी पाऊस बरसल्याने मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अडचणी येत आहेत. या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे, कारण हे पाणी नाशिकमार्गे गोदावरी नदीच्या पात्रातून अहिल्यानगर आणि मराठवाड्याच्या जायकवाडी धरणाच्या दिशेने जात आहे.
























