Nashik : छत्रपतींनीच सुरू केलेल्या गोष्टी तुम्ही नष्ट करणार का? पुजाऱ्यांचा मराठा सेवा संघाला सवाल
नाशिक येथील काळाराम मंदिर प्रकरणाचा मुद्दा उफाळून आल्यानंतर राज्यात आता आणखी एका मागणीने जोर धरलाय. सगळ्या मंदिरातील ब्राह्मण पूजारी हटवावेत अशी मागणी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलीये... काळाराम मंदिरात घडलेल्या प्रकाराचा मराठा सेवा संघाने तीव्र निषेध केला आहे. या प्रकारानंतर आता राज्यातील मंदिरे भटमुक्त करण्याची वेळ आली आहे, असं विधान मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलंय. तसंच मराठा सेवा संघ राज्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. दरम्यान नाशिकच्या कपालेश्वर मंदिरातून पुजाऱ्यांसोबत बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी























