Nashik : नाशिकच्या लाचखोर अधिकाऱ्याच्या धरी सापडलं मोठं घबाड, 1 कोटींची रोकड सापडली
नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसात तब्बल तीन लाचखोर अधिकाऱ्यांना एसीबीनं बेड्या ठोकल्या आहेत.... यात सर्वात मोठी कारवाई नाशिक शहरात झाली...नाशिकच्या आदिवासी विकास बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांना एसीबीनं अटक केलेय... अडीच कोटींच्या कामासाठी १२ टक्के दरानं २८ कोटींची लाच घेताना एसीबीनं त्यांना बेड्याठोकल्या आहेत... एवढच नाही तर बागुलच्या नाशिक, पुणे , आणि धुळ्यातील घरीही छापे टाकले आहेत... इकडे दिंडोरी तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी कमरुद्दीन गुलाम अहमद सय्यदला १० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलेय. तर तिकडे नासिकच्या उपसंचालक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन लांजेवार यालाही २० हजारांची लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलंय.























