Nashik : ड्रीम 11 वर बंदी येणार? नाशिक पोलिसांकडून कारवाईची मागणी
तुम्ही जर ऑनलाइन रम्मी, ड्रीम्स 11 खेळत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण तुम्ही खेळत असलेले ड्रीम्स 11, रम्मी या खेळांसाठी वापरण्यात येणारं सॉफ्टवेअर केंद्र सरकार वा राज्य सरकारनं प्रमाणित केलं नसल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यामुळे तुम्ही खेळत असणाऱ्या ऑनलाईन गेममधून तुमची फसवणूक होण्याची शक्यताच जास्त असल्याचा संशय नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना आहे. त्यामुळे ऑनलाइन गेमवर कारवाईसाठी (सध्याच्या जुन्या आणि कमकुवत) कायद्यात बदल करण्याची मागणी नाशिक पोलिसांनी विधानसभा सदस्य समितीकडे केली. हीच मागणी आता पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली जाणार आहे. यात जास्तीत जास्त शिक्षा दोन वर्षांवरून 3 वर्षे तसेच mpda, आणि मोक्काअंतर्गत कारवाईची तरतूद करण्याची मागणी करण्यात आलीय.
![Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे |Nashik नाशकात कचऱ्याचे ढीग,घनकचरा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/b34de41f6673a0f612be050e2ed81af51738951976813718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Nashik | स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नाशिककरांची तीव्र नाराजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/7cf6ec55a07e0614bd1ad911dd8588301738865073762718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/c33dd45b4a63158f6b635dc1d8eb5065173786231772690_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/11/7de2d29607d17219e2e6183794c93da81736568516530718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/30/c077214dff91c8c17025ce0d123e56f31735548066382719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)